सातारा- लोणंद- शिरवळ रस्त्यासाठी 437 कोटीचा निधी मंजूर

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश

by Team Satara Today | published on : 07 February 2025


सातारा : सातारा ते लोणंद आणि लोणंद ते शिरवळ या 72 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 437 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, नव्या रस्त्यामुळे शिरवळ, लोणंद, वाठार परिसरातील नागरिकांसाठी जलद सुरक्षित आणि दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. पुणे-बेंगलोर महामार्गावरील मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने आणि टोल वाचवण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून हा रस्ता वापरला जातो 20 हजार वाहने या मार्गावरून प्रवास करतात. या रस्त्याच्या दर्जोन्नतीची गरज होती. या चार पदरी रस्त्याचे काम फरसबंद खांदा पद्धतीने केले जाणार आहे.

यामध्ये तेरा पुलांची पुनर्बांधणी, 19 नवीन पूल, 32 पूल, सात जंक्शन आणि 131 कलव्हर्ट उभे केले जाणार आहेत. या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. खासदार उदयनराजे भोसले पत्रकात पुढे म्हणतात, लोणंद, शिरवळ परिसरात नागरिकरण आणि औद्योगीकरण वाढत आहे. महामार्गाशी जोडला जाणारा रस्ता दर्जेदार असावा त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रस्ताव मांडला होता. त्यास मंजुरी मिळाली. या कामाच्या गुणवत्तेबाबत आम्ही सतर्क राहू आणि ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी सातारकरांना दिले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इंडियन आर्मीच्या हल्ल्यात ७ जण ठार
पुढील बातमी
राहुल सोलापूरकर यांच्या विधानाचा कॉंग्रेसच्या वतीने निषेध

संबंधित बातम्या