सातारा: वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत खासगी बसला अपघात होऊन त्यामध्ये ३० ते ३२ कॉलेजचे विद्यार्थी जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांची आ. अतुल भोसले यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून उपचाराबाबत माहिती घेऊन जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. जखमी झालेले विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील आहेत.
नाशिकहून कोकणात गेलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या खासगी बसला वाठार येथे अपघात होऊन त्यामध्ये ३० ते ३२ विद्यार्थी जखमी झाले असून त्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आ. अतुल भोसले यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. दरम्यान कराड प्रशासनाच्या वतीने जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पडेस्क सुरू करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली. दरम्यान नाशिकमधील आ. दिलीप बनकर यांनीही जखमी विद्यार्थ्यांची प्रशासनाकडून माहिती घेतली आहे.