मासेमारी करताना पाण्यात बुडून एकाच्या मृत्यूचा संशय

मृतदेह शोधण्यासाठी शोधकार्य सुरू

by Team Satara Today | published on : 04 January 2025


सातारा : जावली तालुक्यातील आपटी गावातील कृष्णा धोंडीबा कदम वय 42 हे काल रात्री कोयना जलाशयात मासेमारी करण्याकरिता होडीतून गेले होते जाळे टाकताना ते तोल जाऊन पाण्यात पडले व बुडाले. याबाबतची खबर पोलीस पाटील शामराव गायकवाड यांनी पोलिसांना कळवली असून सकाळी स्थानिकांनी गळ टाकून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स ला पाचारण करण्यात आले. त्यांनीही दिवसभर शोधमोहीम राबवली. परंतु त्यांना यश आले नाही. सायंकाळी पाच वाजता शोधकार्य थांबवण्यात आले असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आपटी येथे कृष्णा धोंडीबा कदम हे शिवसागर जलाशयात काल रात्री 8 च्या दरम्यान मासेमारी करण्याकरता गेले होते. होडीतून जाळे टाकताना तोल गेल्याने ते पाण्यात पडले. त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत रात्री मेढा पोलीस ठाण्यात आपटी चे पोलीस पाटील शामराव गायकवाड यांनी या घटनेबद्दल माहिती कळवली. आज सकाळी 10 वाजल्यापासून स्थानिक नागरिक व   

महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स चे जवान होडीतून गळ टाकून, पाणी ढवळून शोध कार्य सुरू करण्यात आले होते.

यावेळी विभागातील गावातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. दरम्यान घटनास्थळी मेढा पोलीस ठाण्याचे बामणोली बीटचे सहायक फौजदार अनिल भिसे, पोलीस कर्मचारी धीरज बेसके, दिवसभर शोध मोहिमेला मार्गदर्शन करत होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मृतदेहाचा शोध न लागल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. तरीही स्थानिक ग्रामस्थांनी होडीच्या साहाय्याने गळ टाकून शोधमोहीम सुरूच ठेवली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण - बारामती मार्गावर बर्निंग एस. टी. बसचा थरार
पुढील बातमी
शनिवार पेठेतून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या