महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा

अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे

by Team Satara Today | published on : 07 October 2025


नागपूर : रजिस्ट्रीसाठी कमिशनबाजी सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट रिंगरोडवरील कोतवालनगरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयातच धडक दिली. यावेळी तेथील रजिस्ट्री प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये पैसे आढळले. 

एका रजिस्ट्रीमागे ५ ते ८ हजारांचे कमिशन : संबंधित कार्यालयात एका रजिस्ट्रीमागे पाच ते आठ हजारांचे कमिशन घेतले जात असल्याच्या तक्रारी बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. 

सहदुय्यम निबंधक आढळले दोषी, पोलिस चौकशी सुरू

कोतवालनगर येथील कार्यालयात रजिस्ट्री करताना पैसे मागितले जातात. तसेच दस्त नियमित नसतानादेखील रजिस्ट्री लावल्या जातात, अशा तक्रारी बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या.

 त्याच्या आधारावर सोमवारी दुपारी त्यांनी तेथे छापा टाकला. यावेळी त्यांनी सहदुय्यम निबंधक अनिल कपले यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. ड्रॉवर उघडल्यावर काही रक्कम आढळली. ही माहिती त्यांनीच पोलिसांना दिली. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किल्ले अजिंक्यतारा, ताराराणी समाधीच्या सुशोभीकरणासाठी २६४ कोटी

संबंधित बातम्या