सातारा : पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील पोस्टाच्या पार्किंगच्या आवारामधून अज्ञात चोरट्याने संजय चंद्रकांत माने रा. डबेवाडी ता. सातारा यांची स्प्लेंडर मोटरसायकल क्र. एमएच 11 सीए 869 चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.