सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या गाडीला दगड मारून गाडीचे 25000 चे नुकसान केले. तसेच तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शुभम राजेंद्र आवळे रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा