सातारा : मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे राज्यात प्रचंड नुकसान झाले आहे .त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या मागे कर्ज वसुलीचा तगादा लावता सरसकट कर्ज माफी द्यावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सातारा तालुका प्रमुख अनिल गुजर, शिवसेना शहर संघटक प्रणव सावंत, युवासेना उपप्रमुख सागर धोत्रे, तालुकाप्रमुख श्रीकांत पवार, उपशहर प्रमुख रवींद्र भणगे, उपशहर प्रमुख राहुल जाधव, शैलेश बोडके, रामचंद्र साळुंखे, सतीश भंडारे आणि शिवसैनिक उपस्थित होते.
या निवेदनात नमूद आहे की, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार उपनेते नितीन बानगुडे पाटील आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वय दगडू सपकाळ यांच्या सूचनेप्रमाणे हे निवेदन देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वर अति पर्जन्यवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटात त्यांची आर्थिक अवस्था बिकट झालेली आहे .त्यामुळे त्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च राज्य शासनाने करावा शेतकरी जी मागील ती मदत त्याला मिळावी बळीराजावरील हे संकट त्यांनी दूर करावे.