सातारा : अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय दत्ताजीराव मिसाळ रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर यांचा 7 सप्टेंबर रोजी सातारा शहर हद्दीत अपघात झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा