सातारा : जुन्या वादाच्या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीतून चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रंगपंचमीला मारहाण केल्याचा राग मनात ठेवून जुन्या वादाच्या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मारहाणीमध्ये कोयत्याचा वापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शुभम पवार, संदीप पवार, आकाश नलवडे (तिघे रा.मंगळवार पेठ, सातारा) यांच्या विरुध्द सिध्दार्थ शिवाजी पवार (वय 22, रा.मंगळवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 23 डिसेंबर रोजी मंगळवार पेठेत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दुसर्या तक्रारीत मंगळवार पेठेत सिध्दार्थ पवार याने शुभम नारायण पवार (वय 23, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना मारहाण केली. डोक्यात बिअरची बाटली तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना दि. 23 डिसेंबर रोजी मंगळवार पेठेत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.