सातारा : आरफळ गावच्या हद्दीत दि २८ रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास चार चाकी चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाला जोराची धडक देऊन जखमी केले आहे.
यामध्ये सत्यजित बाळासाहेब माने (वय ३२ रा.राऊतवाडी, ता.कोरेगाव, जि. सातारा) यांच्या उजव्या पायास, उजव्या हाताला तसेच डोक्यास गंभीर आणि किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे. याप्रकरणी निलेश बाळासाहेब माने (वय ३५,रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कारचालक सचिन सर्जेराव कदम (रा. पिंपोडे खुर्द ता. कोरेगाव, जि.सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार साठे करत आहेत.