सातारा : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा उद्या बुधवार दि.२९ रोजी वाढदिवस साजरा होत असून त्या निमित्ताने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने दुपारी १२ वाजता सातारा येथील जिल्हा रुग्णालयात अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सागर भोगावकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यावर्षी मे पासून राज्यभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात ओला सदृश्य दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असल्याने ना. मकरंद पाटील यांनी यावर्षी वाढदिवस कार्यकर्त्यांनी साध्या पद्धतीने साजरा करा, अशा सूचना दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मुदत कक्षाच्या वतीने उद्या बुधवारी दुपारी १२ वाजता सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री.हरीष पाटणे यांच्या हस्ते रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करण्यात येणार असून रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सागर भोगावकर यांनी कारण केले आहे.