सातारा : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य व ज्या माजी सैनिक विधवांचे पाल्य सन २०२३-२४ या शैक्षणीक वर्षामध्ये इयत्ता १० वी १२ वी च्या परीक्षेमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवूनन उत्तीर्ण असतील अशा पाल्यांना एकरकमी 25 हजार व 10 हजार देवून विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी अशा माजी सैनिक,पत्नी, पाल्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयाकडे उपलब्ध असलेले विहित नमुन्यातील अर्ज दिनांक ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.