कराड : कराड-विटा मार्गानजीक सैदापूर, ता. कराड येथील ओम साई कॉम्प्लेक्समधील चायनीज सेंटरला मंगळवारी (दि. 4) मध्यरात्री आग लागून, सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत ज्ञानेश्वर शिवलिंग कुंभार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सैदापूर येथील जेके पेट्रोल पंपाजवळच्या ओम साई कॉम्प्लेक्समध्ये कुंभार यांचे डीके चायनीज बिर्याणी कॉर्नर हे हॉटेल आहे. कुंभार यांनी मंगळवारी रात्री उशिरा हॉटेल बंद केले. त्यानंतर मध्यरात्री हॉटेलला अचानक आग लागली. या आगीत हॉटेलमधील प्लॅस्टिकची आठ टेबल, 32 खुर्च्या, स्वयंपाकगृहातील भांडी, फ्रिज, डायनिंग हॉलमधील लाईट बोर्ड, पार्टिशनच्या स्लायडिंग खिडक्या, पीओपी डिझाईन, मैदा, नूडल्सचे पोते, तांदळाची पोती जळून एक लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हवालदार काटवटे तपास करत आहेत.