सातारा जिल्ह्यात लाडक्या बहिणींचा संताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 19 March 2025


सातारा : राज्यातील मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचे थकित अनुदान त्वरित मिळावी तसेच महायुतीने नमूद केल्याप्रमाणे सगळीकडे अनुदान बहिणींना तातडीने द्यावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ. छायाताई बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर केले. 

फलटण जिल्हा संघटिका कल्पनाताई गिड्डे, शहर संघटिका लताताई तावरे, खटाव तालुका संघटिका सुमित्राताई शेडगे, तसेच सर्व पुरुष पदाधिकारी सर्व महिला आघाडीने सातारा कलेक्टर ऑफिस परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.

खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असे करू नका निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन देऊन लाडक्या बहिणींच्या जीवावर निवडून आलात आणि आता सरकार खोटं बोलत आहे. लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये खात्यात टाकून फसवणूक केली आहे या योजनेतून दहा लाख महिला वगळण्यात आले आहेत. राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी आणि महिला आणि सर्वसामान्यांना फसवणारा आहे हा अर्थसंकल्प फुसका आहे अशी टीका शिवसेना उपनेत्या सौ छायाताई शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

त्या पुढे म्हणाल्या, आत्ताचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे. सर्वसामान्य माणसासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही महायुती सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी योजना दिल्या जातील असं वाटलं होतं पण तसं घडलं नाही राज्य शासनाने बडा घर पोकळ वासा असा अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पाचा आमचा जाहीर निषेध करत आहोत. बहिणींच्या खात्यात 2100 जमा नाही झाले पुन्हा फसवणूक केली तर सातारा जिल्हा महिला आघाडी वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा छायाताई शिंदे यांनी केली.  प्रसंगी प्रणव सावंत, गणेश अहिवळे, सागर धोत्रे, सुमित नाईक, तानाजी चव्हाण, आणि शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई तालुक्यातील बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
पुढील बातमी
नागपूरच्या जिहादी वृत्तींवर कठोर कारवाई व्हावी

संबंधित बातम्या