पुणे येथील बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शिरवळच्या लॉजिंगमध्ये मृतदेह

पंढरपूर फाटा येथील एका घरामध्ये युवकाची ओढणीने गळफास घेत आत्महत्या

by Team Satara Today | published on : 07 October 2025


खंडाळा  : शिरवळ या ठिकाणी पुणे येथील बेपत्ता असलेल्या 50 वर्षीय एका व्यक्तीचा लॉजिंगमध्ये मृतदेह आढळून आला असून दुसरीकडे पंढरपूर फाटा येथील एका घरामध्ये 18 वर्षीय युवकाने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे येथील दळवीनगर ,कात्रज,आंबेगाव बुद्रुक पुणे येथील दीपक कृष्णराव बोबडे (वय 50) हे शनिवार दि. 4 ऑक्टोबर रोजी भोर जि.पुणे येथे आईचे वैद्यकीय अहवाल देऊन कराड येथे कामानिमित्त जाऊन येतो असे सांगत बेपत्ता झाले होते. दरम्यान, याबाबतची तक्रार पुणे येथील आंबेगाव पोलीस स्टेशन अंकित दत्तवाडी पोलीस चौकीमध्ये बेपत्ता असल्याची नोंद पत्नी स्वाती बोबडे यांनी दाखल केली होती. यावेळी दिपक बोबडे यांनी शिरवळ येथील पळशी रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये शनिवार दि.4 ऑक्टोबर रोजी रूम घेतली होती. यावेळी सोमवार दि.6 ऑक्टोबर रोजी रूमचा दी पक बोबडे हे दरवाजा उघडत नसल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबतची कल्पना लॉजिंग मालकाला कल्पना दिली. 

घटनास्थळी तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.यावेळी रूमचा दरवाजा उघडला असता दिपक बोबडे हे रूममध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आले. यावेळी शिरवळ पोलीसांनी शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्याने शिरवळ ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी नेण्यात आला तर दुसऱ्या घटनेत शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी भाड्याच्या घरामध्ये आई समवेत राहणाऱ्या आर्यन सर्जेराव कांबळे(वय 18,सध्या रा. शिरवळ ता.खंडाळा मूळ रा. कुथटे,  ता.पाटण) याने ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.यावेळी शिरवळ पोलीसांनी शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्याने शिरवळ ग्रामपंचायत रुग्णवाहिकेतून मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केला.या दोन घटनांनी शिरवळ मध्ये खळबळ उडाली असून शिरवळ पोलीसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू करण्यात आला असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.या घटनांची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला सुरू होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा
पुढील बातमी
नगरपालिका नगरपंचायतीच्या प्रभागांसाठी बुधवारी सोडत; राजकीय घडामोडीना वेग; नगरपरिषद संचालनालयाकडून अध्यादेश जाहीर

संबंधित बातम्या