सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपींनी तक्रारदारांच्या मुलीचा कन्याशाळा ते वाघाची नळी येथपर्यंत दुचाकीवरुन पाठलाग केला. तिला मध्येच अडवून किरण याने तिला मोबाईल नंबर मागितला. ओंकार याने त्याचा व्हिडिओ बनविला आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. हा प्रकार दि. 20 रोजी घडला. सहायक पोलीस निरीक्षक केणेकर अधिक तपास करत आहेत.