सातारा : येथील एमआयडीसी येथे धनश्री कंपनीच्या पार्किंग मधून स्प्लेंडर गाडीची चोरी दिनांक १२ रोजी रात्री आठ ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झाली आहे, याबाबतची फिर्याद रणजीत नानासो चव्हाण (वय २४, रा. सहकारनगर, संगमनगर,सातारा) यांनी शहर पोलिसात दिली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करत आहेत.
सातारा शहरातील यशोदा नगर येथील कमानी जवळ पार्क केलेली होंडा कंपनीची ६० हजार रुपये किमतीची ऍक्टिव्हा दुचाकीची अज्ञात चोरट्याने दिनांक १२ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चोरी केली आहे.याबाबतची फिर्याद दुचाकी मालक अमित आनंदराव माने (वय ३९,राहणार आंबवडे खुर्द जकातवाडी) यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करत आहेत.