सातारा : स्थानिक युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुक्ष्म, लघु व सेवा उद्योजकांना आर्थिक मदत केली जात आहे. या योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेची मर्यादा ५० लाखांवरून एक कोटीपर्यंत वाढविली आहे. या योजनेत आतापर्यंत लघु व सेवा उद्योगांतून जिल्ह्यात ३०० कोटींची गुंतवणूक झाली आहे, तर ३६६० जणांना रोजगार मिळाला आहे. ९१५ जणांनी उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून एक लाख सूक्ष्म आणि लघु व्यवसाय निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात सातारा जिल्ह्याने या योजनेत चांगले यश मिळवले आहे. या योजनेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन उत्पादन उद्योगासाठी प्रकल्प मर्यादा ५० लाखांवरून एक कोटीपर्यंत वाढवली आहे. सेवा व कृषिपूरक उद्योगांसाठी २० लाखांवरून ५० लाखांपर्यंत वाढ केली आहे. राज्य शासनाचे अनुदान १५ ते ३५ टक्के इतकेच कायम आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमुळे जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेच्या प्रकल्प मर्यादेत मोठी वाढ करण्यात आली असून, याच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु व सेवा उद्योगांना चालना दिली जात आहे. या योजनेत जिल्ह्यातून ६२१५ जणांनी अर्ज केले आहेत. आतापर्यंत ३६६० जणांना रोजगार मिळाला आहे. यातून सुमारे तीनशे कोटींची गुंतवणूक झालेली आहे. ९१५ जणांनी उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला जिल्ह्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सेवा व लघु उद्योगांच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यामध्ये जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. आगामी वर्षभरात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी उद्दिष्ट गाठणार आहोत.
-उमेशचंद्र दंडगव्हाळ, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा.