सातारा : फलटण बस स्थानक येथे मतदान जागर पथनाट्य द्वारे मतदान जनजागृती व मतदान प्रतिज्ञा घेण्यात आले यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय ईश्वरे, नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव उपस्थिती होते.
यावेळी नोडल अधिकारी फलटण यांनी मतदान बुधवार दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.00 ते 6.00 वाजता मतदान करण्यासाठी घरा बाहेर पडून हक्क बाजवण्या बाबत अहवान करण्यात आले. जागरूक मतदार होऊन लोकशाही बळकटी साठी मतदान करण्यासाठी वेळ काढा तसेच मतदान कर 100 टक्के फलटणकर सांगून मतदान प्रक्रिया मध्ये सहभागी होण्यासाठी अहवान केले.
वाई विधानसभा मतदार संघात फिरत्या चित्ररथातून मतदान जनजागृती :
वाई विधानसभा मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यत मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत मेटतळे, हरोशी, जावली, दरे, नवेनगर, कुंभरोशी, कुमठे, पारसोंड, बिरवाडी, चतुरबेट, शिरवली, देवळी, दुधगांव या ठिकाणी मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून मतदारांमध्ये उत्साही वातावरणात मतदान विषयक जागृती करणेत आली.
या गावांमध्ये विविध मतदान करण्याविषयीचे विविध फलक घेऊन ज्येष्ठ नागरिक, महिला वप्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी जनजगृती केली. तसेच या गावांमध्ये लहान मुलांनी साखळी तयार करुन येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहनही केले.
पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मतदानाच्या दिवशी म्हणजेच येत्या 20 नोव्हेंबरला विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी असतात. या अनुषंगाने पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज पोस्टल मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला.