मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन - जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर

by Team Satara Today | published on : 30 March 2026


सातारा : मिशन लक्ष्यवेध योजनेच्या माध्यमातून ऑलम्पिंक स्तरावर खेळल्या जाणा-या खेळ प्रकारामध्ये लक्ष्य केंद्रीत करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.  ही योजना त्रिस्तरीय असून राज्यस्तरावर हाय पर फॉर्मंस सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट एक्सलन्स सेंटर व जिल्हास्तराव क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामार्फत कुस्ती, मैदानी, हॉकी, धनुर्विद्या, शूटींग अशा एकूण पाच क्रिडा प्रकारामधून प्रत्येक 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.  या निवड चाचणीकरीता सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी कागदपत्रांसह 15 एप्रिल 2026 पर्यात अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा येथे प्रत्यक्ष अथवा sataradso@gmail.com,  dsosatar@yahoo.co.in या ईमेलवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.  

या निवड चाचणीसाठी पुढील निकषास खेळाडूनी पात्र असावे.  खेळाडू हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व त्याचे वय त्या वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी 21 वर्षाआतील असावे.  अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैद्यकीय  फिटनेस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, गत  दोन वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोटसाईज 3 फोटो, शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.


खेळाडूंची निवड ही तज्ञ समितीकडून करण्यात येणार असून आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, प्रवासखर्च, मार्गदर्शक, वैद्यकीय उपचार, विमा, व प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च योजनेमधून केला जाणार असल्याची माहितीही श्री. तारळकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे येथे अर्धन्यायिक प्रकरणांच्या अनुषंगाने लोकअदालतीचे आयोजन; अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने
पुढील बातमी
सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

संबंधित बातम्या