राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला साताऱ्यात जोडे मारो आंदोलन

प्रभाग क्रमांक आठ मधील उदयनराजे समर्थक आक्रमक

by Team Satara Today | published on : 07 February 2025


सातारा : छत्रपती शिवरायांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला साताऱ्यात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आकाशवाणी झोपडपट्टी परिसरातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी हे आंदोलन केले, या वक्तव्याबद्दल त्यांनी तमाम महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी उदयनराजे समर्थक रवी राजू माने, रमेश धडचिरे, विजय कांबळे, अजय कांबळे, नवनाथ बुरुंगले, लखन मोरे, शिवाजी बुरुंगले, अनिकेत गडचिरे, नितीन इंगवले, विकास बुरुंगले, सिद्धार्थ धडचिरे, लाला घाडगे, अविनाश गाडगे, राज धडचिरोली, युवराज भोसले, सागर इंगवले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परिक्षेचा निकाल १००%
पुढील बातमी
जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या घटली 5 लाखानं

संबंधित बातम्या