सातारा : भारत सरकारच्या धर्तीवर वार्षिक उदयोग पाहणी सन २०२३ - २४ या विषयावर सर्वेक्षण होणार आहे. सदर पाहणी अंतर्गत संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई कार्यालयामार्फत १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधी पर्यंत काम पूर्ण करावयाचे आहे. तरी संबंधित कारखान्याच्या आस्थापनांनी या कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांना योग्य ते सर्व सहकार्य असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक यशवंत थोरात यांनी केले आहे.
विश्लेषण कारखान्यांची संख्या स्थिर व कार्यरत भांडवल उत्पादन आणि निव्वळ मूल्यवर्धन यासारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. तसेच उद्योगांचे जिल्हा उपन्न मधील योगदानही यावरून समजते.
तालुका निहाय कारखान्याची माहिती पुढील प्रमाणे आहे. कराड - ८, खंडाळा-12,महाबळेश्वर -१, दहिवडी -१, फलटण -२, सातारा - १८, वाई -३. या तालुक्यातील निवड झालेल्या कारखान्यांना प्रत्येक्ष भेटी देवून माहिती संकलित करण्यात येणार आहे.