सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरगाव ते नांदगाव रस्त्यावर खोजेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराने वाहतूक नियमांचे पालन न करता, भरधाव वेगाने दुचाकी चालवत एसटी बसला धडक दिली. यात दुचाकीस्वारासह पाठीमागे बसलेली वयस्कर व्यक्ती जखमी झाली. दि. 23 रोजी रात्री 8.45 च्या सुमारास घटना घडली.
एसटीचालक दशरथ वामनराव कदम (रा. भुरकवडी, ता. खटाव, सध्या रा. करंजे, सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, प्रकाश पांडुरंग कळके (रा. करंजे तर्फ परळी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रामदास शंकर माने (वय 63, रा. डबेवाडी, ता. सातारा) हे जखमी झाले आहेत. पोलीस हवालदार गवळी तपास करत आहेत.