सातारा : एकाला मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी 15 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी सातारा तालुक्यातील एका गावात असणाऱ्या दुर्गादेवी मंदिरासमोर साऊंडचा आवाज कमी कर म्हटल्याच्या कारणावरून एकास मारहाण करून त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी हणमंत महादेव गोरे, सागर हणमंत गोरे, रेखा हणमंत गोरे, मृणाल सागर गोरे, सारिका दादा माने, चैत्राली हणमंत गोरे, दादा अशोक माने, अशोक शंकर माने, दाजी हणमंत माने, उषा हणमंत माने, बिंदू रावसाहेब फडतरे, संभाजी प्रकाश फडतरे, अप्पा अशोक माने, चंद्रकांत शंकर फडतरे, रोहित रमेश जाधव (सर्व रा. जिहे, ता. सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले करीत आहेत.