सातारा : सातारा-कोरेगाव-पंढरपूर-मोहोळ या महामार्गावरील पहिल्या टप्प्यात पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या 52 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या काँक्रीटकामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. या रस्त्याला नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील अशी आश्वासन यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम,नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जोशी, प्रशांत खैरमोडे तसेच बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सातारा शहराच्या पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटीबद्ध आहे असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले सातारा कोरेगाव पंढरपूर मोहोळ या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निधी मंजूर केला आहे .यापैकी पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा संपूर्णपणे काँक्रीट करण्यात येणार आहे . .रस्त्याच्या मधोमध आकर्षक दिवे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रशस्त असा फुटपाथ तयार करण्यात येणार आहे .जिल्हा परिषद कॉर्नर ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर फळ विक्रेते पदपथावर असतात त्यांनी पदपथाच्या आत व्यवसाय करावा त्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या रस्त्यावर नागरिक मोठ्या प्रमाणावर सकाळी चालावयास येतात त्यांना चालण्यासाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक आणि बसण्यासाठी बेंचेस ची सोय केली जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले. या रस्त्याचे काम अधिक दर्जेदार आणि अद्ययावत करण्याच्या सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.