सातारा : सातारा शहर परिसरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी के बी पी कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या मातोश्री होस्टेल, सदर बाजार, सातारा येथून एक विवाहिता घरातील कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.