फलटण : बाजारपेठेतून गाडी हळू चालव म्हटले म्हणून दोघा भावानां लोखंडी हत्यार, दगड व काचेच्या बटल्यांनी मारहाण करीत जबर जखमी केल्याची घटना शंकर मार्केट जुनी मंडई येथे घडली असून दोन्ही भाऊ मृत्यूशी झुंज देत आहेत. दरम्यान या घडलेल्या घटनेचा निषेधार्थ संपूर्ण फलटण शहरातील व्यापारी तसेच शहर वासियांनी फलटण शहर पोलिस ठाण्यावर हजारोच्या संख्येने मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवित त्या फळकूटदादांची भर रस्त्यावर धिंड काढावी व त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कठोर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी केली आहे.
रविवारी फलटण येथे आठवडी बाजार असतो मात्र गेली अनेक दिवस झाले फलटण शहरातून अल्पवईन मुले बुलेट चा आवाज करीत तसेच यामाहा व इतर मोटारसायकल चे सायलेंसर काढून मोठमोठा आवाज करीत धडकी भरेल अशा भरगावं वेगात मोटारसायकल चालवतात हे सर्व मुलांच्या वडिलांचे मटका जुगार चक्री तसेच गांजा अफू असे व्यवसाय असल्यामुळे त्यांचे पोलिसांबरोबर आर्थिक हितसंभंध असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही यामुळे या फळकूट दादांची मुजोरी वाढली आहे.
याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने या दहा ते बारा गुंडानी काल रविवार दि. 22 रोजी अनिल हिरणावळे व संतोष हिरणावळे या दोन्ही बंधूवर हत्यार,काठ्या व काचेच्या बाटल्या यांचा मारा करीत डोक्यात हातावर तसेच चेहऱ्यावर मारले. या दोघांना अतिदक्षता विभागात ठेवले असून त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज सोमवारी संपूर्ण फलटण शहरातील नागरिकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यावर हजारोच्या संख्येने एकत्र येत मोर्चा काढला. त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत अक्षरशः दोन नंबरच्या व्यवसायची तसेच मिळत असलेल्या हप्तेखोरीची पोलखोल केली.
विविध संघटनांनी दिलेले जाणार असे म्हटले आहे की, हा हल्ला केवळ एका व्यवसायावर नसून तो फलटणच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे. शहरात १०-१२ जणांची टोळी हातात उघडी शस्त्रे घेऊन फिरते आणि एखाद्या निष्याप व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न करते, ही बाब पोलीस प्रशासनाचे अस्तित्वच धोक्यात आणणारी आहे. या हल्लूयातील जखमींची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना, अशा प्रकारे दहशत माजवून सामान्य माणसाचे जगणे कठीण करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच ठेचणे गरजेचे आहे.
आमची प्रशासनाकडून हीच अपेक्षा आहे की, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांसह सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या-वर खुनाचा प्रयत्न आणि संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कठोर कारवाई करण्यात यावी. जर अशा गुंडांना वेळीच पायबंद घातला नाही, तर भविष्यात शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याने सुरक्षितपणे व्यवसाय कसा करायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण होईल, केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, अशा प्रकारांना कायमस्वरुपी आळा कसा घालता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
प्रशासनाला आमचा हा इशारा आहे की, या घटनेचा तपास संथ गतीने झाल्यास किंवा आरोींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास, आम्ही शांत बसणार नाही. या अमानुष कृत्याचा निषेध म्हणून संपूर्ण फलटण शहर बंद ठेवून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला केवळ पोलीस प्रशासनच जबाबदार राहील याची कृपया योग्य नोंद घ्यावी. या गुंडाकडून दारू गांजा पिऊन धुडघूस घालीत असताना पोलीस हातावर हात ठेऊन गप्प बसत आहेत तसेच आता तुम्हांला कायदा व सुव्यवस्था राखता येत नाही आता आमच्या ताब्यात पोलीस खाते द्या मग आम्ही त्या गुंडाचा बंदोबस्त करू असा ईशारा देत संध्यकाळी हे सगळे गुंड अटक न केल्यास फलटण शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून फलटण शहर बंद ठेऊन निषेध करू असा इशारा दिला आहे.