मुंबई : आज विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आहे. राज्यात निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीमध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. काही ठिकाणी यश आलं मात्र अनेक ठिकाणी बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे आता अनेक विधानसभा मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होणार असून, याचा मोठा फटका हा अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
पुण्यातील कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. कमल व्यवहारे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राजू तीमांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर सुधीर कोठारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघातून मविआकडून अतुल वांदीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मालेगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. मालेगावात बंडूकाका बच्छाव यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर भाजपचे बंडखोर उमेदवार कुणाल सूर्यवंशी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठीकाणी आता अद्वय हिरे, दादा भुसे आणि बंडूकाका बच्छाव अशी तिरंगी लढत होणार आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोपरी पचपाखडी मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे न घेतल्यानं या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |