काँग्रेसच्या महिला आघाडीचे साताऱ्यात धरणे आंदोलन; डोळ्यावर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवला, डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 01 November 2025


सातारा : फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भाने काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महिला आघाडी प्रदेश समितीचे अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून आपला निषेध नोंदवला.

आंदोलक महिलांनी हाताला आणि डोळ्याला काळी पट्टी बांधत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की,  डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावर अनेक व्यक्तींनी दबाव आणला. याचा त्यांनी त्यांच्या तक्रार पत्रामध्ये उल्लेख केला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस निरीक्षक जायपत्रे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंशुमनं धुमाळ,माजी खासदार आणि त्यांचे दोन स्वीय सहाय्यक यांची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच डॉक्टर मुंडे यांनी त्यांच्या सेवाकाळात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या तसेच माहिती अधिकाराखाली चौकशी बाबत माहिती मागवली मात्र या अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई झाली नाही त्यात कालीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने त्यांचा नंबर ब्लॉक केला होता ही बाब अत्यंत गंभीर आहे.

डॉक्टर मुंडे प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल व्हावे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी पीडीतेचे चारित्र्य हननं केले त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व संबंधित सर्व अधिकारी व व्यक्तींचे सीडीआर तपास करून मृत्यू पूर्व काळातील संवाद व संपर्क तपासले जावेत आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमध्ये भर बाजारपेठेतील बंगला फोडून साडेचौदा लाखाचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास
पुढील बातमी
बोरगाव येथे जुगार अड्डयावर कारवाईत एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या