सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी मंगळवार पेठेतील समर्थ मंदिर ते बोगदा जाणाऱ्या रस्त्यावर बाबुराव कोंडीबा जांगळे रा. मंगळवार पेठ, सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच रामचंद्र कोंडीबा जांगळे, सौ धोंडाबाई रामचंद्र जांगळे, महेश रामचंद्र जांगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा