बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण; चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 16 January 2026


सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट मावशी पेट्रोल पंपाशेजारी ४ जणांकडून एकाला कोयत्याने मारहाण केल्याची गंभीर घटना दि. १३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या थरारक घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी प्रमोद राजू कांबळे (वय १९, रा. देशमुखनगर, वनवासवाडी) हा सुरक्षारक्षक असून बुधवारी दि. १३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरून कामासाठी जात असताना बॉम्बे रेस्टॉरंट येथे मावशी पेट्रोल पंपाजवळ आला असताना त्याला अजिंक्य काटे, रुद्र भालेराव, औदुंबर भालेराव, दिनेश तापकिरे यांनी अडवून कोयत्याने मारहाण केली. 

यामध्ये प्रमोद याच्या डोक्याला पाठीमागून कोयत्याने मारून पळ काढला. यावेळी फिर्यादीने डावा हात पुढे केल्याने हाताच्या अंगठ्याला आणि बोटाला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर आरोपींनी हाताने देखील मारहाण केली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात कलम ११५ (२) ११८ (१) ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस नाईक बोराटे करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची ‘गॅस सिलेंडर’ चिन्हासाठी मागणी
पुढील बातमी
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी

संबंधित बातम्या