सातारा : सातारा शहर पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात जुगार प्रकरणी सनी विश्वास ढावरे (वय ३२, रा. पाडेगाव, ता. फलटण) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १२८० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.