विठ्ठल गोविंद तारळेकर (वय ७६, रा. झुलेलाल चौक, सांगली) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात पुजा नितीन तारळेकर (वय ३०), त्यांचा मुलगा देवांश नितीन तारळेकर (वय अडीच वर्ष), नितीन विठ्ठल तारळेकर (वय ३६, सर्व रा. झुलेलाल चौक, सांगली), राजेश्वरी महेंद्र लोकरे (वय १६), विरधवल महेंद्र लोकरे (रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण सांगली येथून कारने (एमएच १० बीएम ४२४८) पुण्यातील नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघाले होते. यावेळी नितीन तारळेकर हा कार चालवित होता. शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीतील राजस्थान ढाब्यासमोर आल्यानंतर तेथील खड्डा चुकवताना महामार्गाच्याकडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या कारची पाठीमागून जोरदार धडक बसली. या घटनेनंतर अज्ञात ट्रकचालक हा अपघातस्थळावरुन तत्काळ पुढे निघून गेला. यामध्ये कारच्या पुढच्या सीटवर बसलेली पुजा तारळेकर त्यांचा मुलगा देवांश यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तर कारमध्ये पाठीमागे बसलेली राजेश्वरी, विरधवल आणि विठ्ठल तारळेकर यांच्याही डोक्याला, हातापायाला गंभीर जखम झाली. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विठ्ठल तारळेकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सर्व जखमींवर सिव्हिलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या अपघाताची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार किशोर वायदंडे आणि हवालदार विशाल मोरे हे करीत आहेत.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |

मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |