सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि महिला व बालविकास, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियान आणि राष्ट्रीय मानवी तस्करी या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे न्यू इंग्लिश स्कूल, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महिला व बालविकास सुजाता देशमुख, तालुका संरक्षण अधिकारी पवन अहिरे, संकेत मोरे, उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती बेदरकर सातारा यांनी बालविवाह मुक्त भारत अभियान आणि राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. श्री. पवन अहिरे, तालुका संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास सातारा यांनी नालसा (मुलांसाठी बाल अनुकूल कायदेशीर सेवा) योजना २०२४ आणि बालविवाह या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमामध्ये सर्वांनी बालविवाह आणि व्यसनमुक्तीची शपथ घेतली.