सातारा : पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी दुपारी तीन वाजण्याच्यापूर्वी कण्हेर, ता. सातारा येथील कण्हेर धरणातील पाण्यात बुडून चंद्रकांत दगडू जाधव रा. आगुंडेवाडी, वेळे, ता. सातारा यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.