‘स्वदेशी’ राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे दि. 30 नोव्हेंबर रोजी आसू येथे आयोजन

by Team Satara Today | published on : 17 November 2025


फलटण   : हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांची जयंती व पुण्यतिथी दिन ‘स्वदेशी दिन’ म्हणून देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्त आसू येथे श्री काळेश्वर मंदिर आसू येथे रविवार दि. 30 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

स्वदेशी भारत बचत गट सकुंडेमळा आणि श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आसू यांच्या संयुक्त सहभागाने, 15 वे स्वदेशी भारत साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी काव्य लेखन, निबंध लेखन, प्रकाशित पुस्तक व दिवाळी अंक स्पर्धा घेण्यात आली होती. त्यास्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रत्येक विभागातील विजेत्या सारस्वतास ‘स्वदेशी भारत साहित्य सन्मान पुरस्कार 2025’ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे उर्फ बाळराजे खर्डेकर निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलन अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता भुषवणार आहेत. काव्यसंलेन अध्यक्ष प्रा. इंद्रजीत पाटील (बार्शी) असणार आहेत. प्रमुख उपस्थितीत सर्वोदयी कार्यकर्ते जीवन इंगळे गुरुजी, हनुमंत चांदगुडे, पाठ्यपुस्तकातील कवी प्रदीप कांबळे, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद झांबरे उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 10 वाजता सारस्वतांचे स्वागत, 11 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल, 12 वा. हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांची जयंती व पुण्यतिथी साजरी होईल. नंतर सर्व विजेत्या सारस्वतास ‘स्वदेशी भारत साहित्य सन्मान पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येईल.

दुपारी 1 वाजता प्रा. इंद्रजीत पाटील, बार्शी यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्यसंमेलन होईल. काव्य संमेलनात सहभागी कवींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास मुदतवाढ
पुढील बातमी
बदनामीच्या षडयंत्राआडून मला डावलण्याचा डाव; जि. प. निवडणूक लढण्याचा निर्धार

संबंधित बातम्या