सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक महिला जखमी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाका, सातारा येथे अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने महिला जखमी झाली. ही घटना दि. 20 फेब्रुवारी रोजी घडली असून याप्रकरणी विजय राजाराम वायदंडे (वय 47, रा. मंगळापूर ता.कोरेगाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार पत्नीसोबत दुचाकीवरुन जात असताना अपघात झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.