सातारा : जुन्या भांडणाचा वाद मिटवण्याच्या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आदित्य मंगावणे, आलोक मंगावणे, शंकर मंगावणे यांच्या विरुध्द रोहित अशोक कदम (वय ३६, रा. खेड ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. ४ ऑक्टोबर रोजी सिव्हील हॉस्पिटल समोर घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.