निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांचा प्रतापसिंहनगर व खेड परिसरात भव्य रूट मार्च

पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा ठाम संदेश

by Team Satara Today | published on : 04 February 2026


सातारा  : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी सातारा पोलिसांच्यावतीने प्रतापसिंहनगर व खेड परिसरात भव्य रूट मार्च काढण्यात आला.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ७० पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या रूट मार्चमध्ये शहर पोलीस, दंगल नियंत्रण पथक तसेच इतर विशेष पथकांचा सहभाग होता. प्रतापसिंहनगर व खेड परिसर निवडणूक काळात संवेदनशील मानला जात असल्याने संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच समाजकंटकांना स्पष्ट संदेश देण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला. पोलिसांनी गल्लीबोळ, मुख्य रस्ते तसेच गर्दीच्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत नागरिकांशी संवाद साधला.

या रूट मार्चमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना कराडच्या भूमी अभिलेखमधील उपअधीक्षक जाळयात
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेच्या गेटवरच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या; मानधन प्रलंबित राहिल्याने आंदोलनास सुरुवात

संबंधित बातम्या