हिवाळ्यात पायात मोजे घालून झोपताय?

आताच थांबवा नाहीतर उद्भवतील आरोग्याच्या गंभीर समस्या

by Team Satara Today | published on : 21 November 2024


हिवाळ्यात थंड पाय कोणालाही आवडत नाहीत. विशेषत म्हणजे जेव्हा आपण झोपलेले असतो त्यावेळी तर बिलकुल नाही. आपल्यापैकी बहुतेकजण झोपेच्या वेळीही आपले मोजे घालतात. यामुळे उबदारपणा मिळतो. पण, अनेकांना आश्चर्य वाटेल की हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, मोजे घालून झोपताना आपले वडिलधारेही रागवतात. याचविषयी आज सविस्तर जाणून घेऊया. मोज्यांमुळे थंडीपासून आराम मिळतो, पण आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. अशावेळी जाणून घेऊया थंडीच्या दिवसात मोजे घालून झोपणे धोकादायक का आहे, यामुळे आपल्या आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते.

हिवाळ्यात मोजे घालून झोपण्याचे तोटे कोणते?

1. पायात घाम साचणे

हिवाळ्यात दिवसभर मोजे घातल्यास किंवा रात्री मोजे घालून झोपल्यास पायात घाम साचतो. यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते आणि त्वचेचे नुकसान होते.

2. पाय दुखणे

मोजे घातल्याने पायातृही वेदना होऊ शकते. विशेषत: जर तुमच्या पायात आधीच समस्या असेल तर ती वाढू शकते. मोजे घातल्याने बॅक्टेरियाचे संक्रमण देखील होऊ शकते, ज्यामुळे आपल्या पायाच्या समस्या अधिक वाढू शकतात.

3. खराब झोपेची गुणवत्ता

मोजे परिधान केल्याने आपल्या झोपेची गुणवत्ता देखील बिघडू शकते, कारण आपल्या पायात उष्णता आणि घाम येण्यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. पुरेशी झोप न घेतल्याने इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.

4. त्वचेच्या समस्या

थंड हवामानात मोजे परिधान केल्याने एक्जिमा आणि त्वचारोग यासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. इतकंच नाही तर जास्त वेळ मोजे घातल्यास त्वचेच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

5. एलर्जी-अस्वस्थता

थंडीत लोकरीचे मोजे परिधान केल्यास हात-पायात अ‍ॅलर्जी होण्याचा धोका असतो. यामुळे रक्ताभिसरणात समस्या उद्भवू शकतात. खूप घट्ट मोजे परिधान केल्याने रक्त प्रवाह कमी होऊ शकतो. यामुळे मज्जातंतूंवर दबाव येतो आणि हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. अतिउष्णता येऊ शकते, ज्यामुळे रात्री अस्वस्थता उद्भवू शकते.

हिवाळ्यात मोजे घालताना काय काळजी घ्यावी?

1. लोकरीच्या मोज्याऐवजी तुम्ही कॉटन मोजे घालू शकता. हे घालून झोपल्याने रात्री नुकसान होण्याचा धोका कमी होतो.

2. जास्त घट्ट मोजे घालू नका, स्वच्छतेकडे लक्ष द्या.

3. मोजे घालायचे नसतील तर उबदार पलंगावर झोपावे, यामुळे चांगली झोप येईल, थंडीही जाणवेल.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
टॅक्स हटवल्यानंतर 'द साबरमती रिपोर्ट'ची बॉक्स ऑफिसवर केली चांगली कमाई!
पुढील बातमी
युक्रेनवर मोठा हल्ला

संबंधित बातम्या