अवघ्या काही मिनिटांतच तांदळाच्या पिठापासून तयार करा कुरकुरीत मेदूवडा

by Team Satara Today | published on : 23 November 2024


सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरत असतो, ज्यामुळे सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नये. आता नाश्ता म्हटला की, तेच तेच नाश्त्याचे बोरिंग पदार्थ आठवू लागतात. अनेकांना नाश्त्यात साऊथ इंडियन पदार्थ खायला फार आवडतात. यात इडली, मेदुवडा, डोसा या पदार्थांचा समावेश असतो मात्र हे पदार्थ बनवणे इतके सोपे नाही यासाठी तांदूळ, डाळ भिजत घालून याची पेस्ट करून मग हे मिश्रण आंबवावे लागते आणि मग यापासून पदार्थ बनवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत बराच वेळ जातो.

तुम्ही चविष्ट आणि झटपट तयार होणार नाश्त्याच्या रेसिपीच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची असणार आहे. आज आम्ही तुम्हाला झटपट काही मिनिटांचं मेदुवडा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असणारा हा मेदुवडा अनेकांना सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय वाटतो. मात्र यासाठी आदल्या दिवशीच डाळ भिजवून ठेवावी लागते. अशात आज आम्ही तुम्हाला झटपट मेंदू वडा कसा तयार करता येईल याची एक अनोखी रेसिपी सांगत आहोत. हा मेदू वडा तांदळाच्या पिठापासून तयार केला जाईल. तांदळाच्या पिठापासून तयार केलेला हा मेंदू वडा चवीला छान लागतो आणि कमी वेळेत बनून तयार होतो. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

2 कप तांदळाचे पीठ

3-4 बटाटा

1 चमचा किसलेलं आलं

3-4 हिरव्या मिरच्या

तेल

मीठ

कृती :

तांदळाचा पिठाचा मेदुवडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक मोठे टोप ठेवा

यात पाणी टाका आणि या पाण्याला उकळी येऊ द्या

पाण्याला उकळी आली की यात तूप आणि मीठ टाका

यानंतर यात तांदळाचे पीठ टाका आणि ढवळून झाकून एक वाफ घ्या

यानंतर हे तांदळाचे पीठे एका परातीत काढा आणि यात उकडलेला बटाटा, मीठ घालून पीठ मळून घ्या

आता तयार पिठाचे मेंदू वडे तयार करा

दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका

तेल गरम झाले की मध्यम आचेवर तयार मेदुवडे छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या

गरमा गरम तांदळाचे वडे एका प्लेटीत काढा

तयार मेंदू वडे नारळाची चटणी आणि सांबारासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री : एकनाथ शिंदे
पुढील बातमी
वेब सिरीजपेक्षा खूप वेगळा आहे मिर्झापूर चित्रपट : मुन्ना भैया

संबंधित बातम्या