फसवणुकीसह चोरी प्रकरणी महिलेसह अन्यजणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 July 2025


सातारा : फसवणूक करुन घरातील सुमारे दहा तोळे दागिने चोरुन नेल्याप्रकरणी एका महिलेसह अन्यजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहित महिलेने अनेक विवाह केले असताना ते लपवून लग्न करुन व घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना शाहूपुरी येथे घडली आहे. संशयित सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील असून सोन्याचा ऐवज सुमारे 10 तोळे वजानाचा असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या