राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत खंडाळा संघ प्रथम; संघातील तिघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

by Team Satara Today | published on : 15 November 2025


सातारा  :  अहिल्यानगर येथे झालेल्या 17 वर्षाखालील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत राजेंद्र विद्यालय खंडाळा संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुरुवारी दि.13 रोजी रात्री उशिरा झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई संघाचा पराभव करून खंडाळा संघाने विजेतेपद पटकावले. खंडाळा संघातील तिघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल खंडाळा संघातील आयुष पवार, यश पवार व रोहित पवार या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. खंडाळा संघाच्या या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे खंडाळा विभाग शिक्षण समिती तसेच खंडाळा तालुकावासीयांमधून कौतुक तसेच समस्त क्रीडाप्रेमींमधून या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाडळीतील बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा उघड; एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांची कामगिरी
पुढील बातमी
धक्कादायक : तृतीयपंथीयांचे भयानक कांड

संबंधित बातम्या