गोडोलीत एसटीवर दगडफेक; चालक जखमी

by Team Satara Today | published on : 03 February 2018


सातारा : गोडोली नका येथे मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने एसटी बस फोडल्याने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून एसटी चालक जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,  मंगळवारी रात्री पोवई नाक्याकडून अजंठा चौकाकडे एसटी बस निघाली होती. एसटी गोडोली येथील साईबाबा मंदिर येथे आल्यानंतर त्याचा वेग कमी होता. याचवेळी एकाने  एस.टी काचेवर दगड मारला. काच फुटून ती चालकाला लागली. सुदैवाने  एसटी चालकाने एसटीवर नियंत्रण मिळवत एसटी बाजूला घेतली. दरम्यान, एसटीवर दगडफेक झाल्याने प्रवाश्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

या घटनेनंतर परिसरात गर्दी उसळली. दगडफेक करणारा संशयित अंधाराचा गैरफायदा घेऊन पळून गेला असल्याचे घटनास्थळावरील नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वाहतूक सुरळीत केल्यानंतर एसटी चालकाकडे पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. दगडफेकीचे कारण रात्री उशीरापर्यंत समोर आले नसून पोलिस घटनेबाबत माहिती घेत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लेखकाकडून अखेर दिलगिरी ;घोडचूक केल्यास याद राखा !
पुढील बातमी
test

संबंधित बातम्या