सातारा : शहर पोलिस ठाण्यासमोर आपापसात भांडणकरून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी ११ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय घाडगे, प्रसाद घाडगे, तानाजी बडेकर, पुजा सय्यद, अमृत शिवगण, लक्ष्मण घाडगे, पुजा घाडगे, आरती घाडगे, सुवर्णा घाडगे, जया फरास, किरण घाडगे (सर्व रा. रविवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुहास जगन्नाथ कदम यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार मोहिते तपास करत आहेत.