तामजाई नगर येथे युवकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 02 May 2025


सातारा : तामजाई नगर येथील नोबल रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या 41 वर्षीय इसमाने घराच्या बेडरूम मध्ये सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दिनांक २९ एप्रिल रोजी रात्री अकराच्या नंतर घडल्याचा अंदाज आहे.

या प्रकरणी हर्षवर्धन हरिश्चंद्र चव्हाण वय 22 रा. भाकरवाडी, तालुका कोरेगाव यांनी फिर्याद दिली आहे. आत्महत्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही नेहमीप्रमाणे पवार हे रात्री झोपण्यासाठी गेले असता, सकाळी त्यांचा मृतदेह फॅनला लटकलेला अवस्थेत आढळून आला. सहायक फौजदार साबळे अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोडोली येथे एकाला लोखंडी पाईप ने मारहाण
पुढील बातमी
बेजबाबदारपणे वाहन चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या