कापडी पिशव्या वापरण्याचा पर्यावरण पूरक संदेश

उपप्रादेशिक प्रदूषण महामंडळ व सातारा पालिका यांची संयुक्त रॅली

by Team Satara Today | published on : 06 June 2025


सातारा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपप्रादेशिक प्रदूषण महामंडळ सातारा व सातारा नगरपालिका यांच्या वतीने सातारा शहरातून सकाळी राजपथावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे एकल प्लास्टिक टाळा आणि कापडी पिशव्या वापरा, असा संदेश देण्यात आला. या संदेशाचे फलक या रॅलीमधील सहभागी सदस्यांनी झळकवत सातारकरांचे लक्ष वेधून घेतले.

या रॅलीची सुरुवात पोवई नाका शिवतीर्थ येथून झाली. या रॅलीमध्ये नगरपालिका प्रदूषण महामंडळ यांचे 50 कर्मचारी तसेच सायकलवरून 25 शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. ही रॅली पोवई नाका, महाराजा सयाजीराव विद्यालय, तेथून शाहू चौक, देवी चौक, मोती चौक मार्गे राजवाड्यावर गेली. या रॅलीमध्ये पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेश देण्यात आला. सातारा शहरामध्ये अजूनही एकल प्लास्टिकचा वापर कायम आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. ही हानी टाळून सातारा शहर स्वच्छ करणे आणि पर्यावरण पूरक ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, अशा संदेशाचे फलक यावेळी रॅलीमध्ये झळकवण्यात आले. या रॅलीतील सदस्यांनी सातारकरांना पर्यावरण पूरक संदेशाचे कार्ड सुद्धा मोफत वाटले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी रणजीतसिंह देशमुख
पुढील बातमी
बनघर ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

संबंधित बातम्या