जिल्ह्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही; संघटन वाढीसाठी शिंदे गट शिवसेनेच्या रेश्मा जगताप सक्रिय

by Team Satara Today | published on : 16 January 2026


सातारा  : पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद चांगल्या पद्धतीने वाढत आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाने आपली ताकद दाखवली. सातारा जिल्ह्यामध्ये संघटनात्मक विस्तार आणि पक्ष बांधणी या दृष्टीने पक्षाची वाटचाल सुरू असून या प्रक्रियेमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लक्ष घातले आहे .पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न निश्चित सोडवले जातील अशी स्पष्ट ग्वाही शिवसेना शिंदे गटाच्या सातारा जिल्हा संपर्कप्रमुख रेश्मा ताई जगताप यांनी दिली. 

तसेच सातारा जिल्ह्यामध्ये महिलांचे संघटन व्यापक करण्याच्या दृष्टीने तालुका निहाय महिलांचे मेळावे घेतले जातील असे त्यांनी सांगितले. जगताप यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संपर्क साधला .उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्यावर सातारा जिल्ह्याची संघटनात्मक बांधण्याची जबाबदारी सोपवली याबाबतची निवड जाहीर झाल्यानंतर रेश्मा ताई जगताप यांनी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आपला मतदानाचा हक्क बजावून त्या तात्काळ साताऱ्याकडे रवाना झाल्या .दुपारी त्यांनी प्रसार माध्यमांचा समोर आपली भूमिका स्पष्ट केली.

रेश्माताई पुढे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढत आहे .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मेढा पाचगणी कराड नगरपालिकेच्या तुलनेने साताऱ्यात शिंदे गटाला मर्यादित यश मिळाले . या दृष्टीने कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी आणि रचनात्मक फेरबदल यापुढे लवकरच पहायला मिळतील. पक्षासाठी तळमळीने झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते यांना निश्चित ताकद दिली जाईल त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही .कार्यकर्त्यांची प्रश्न पक्षश्रेष्ठींपुढे मांडून ते सोडवण्याच्या दृष्टीने माझी भूमिका यापुढे राहील असेही त्यांनी सांगितले.


सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. 16 जानेवारी पासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे .त्या पार्श्वभूमीवर शिंदे ग ट जिल्ह्यात स्वबळावर लढणार की आघाडी करून याबाबत बोलताना रेशमाताई म्हणाल्या याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई हे समन्वयाने चर्चा करून घेतील संघटनात्मक पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी करणे आणि निवडणुकांमध्ये राजकीय धोरणांची रणनीती यशस्वी करणे ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. याबाबत योग्य ते धोरण निश्चित स्वीकारले जाईल.सातारा जिल्ह्यात महिलांचे संघटन वाढवण्याच्या दृष्टीने तालुका निहाय महिलांचे मेळावे हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतले जातील. या कार्यक्रमाला एक सांस्कृतिक झालर असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या महिला जोडल्या जातील त्यांना राजकीय दृष्ट्या सक्रिय करणे हा यामागचा हेतू असल्याचे रेश्मा जगताप यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात संघटना बांधणीसाठी आपण जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सन्मानाची वागणूक मिळावी अन्यथा चर्चेचे पर्याय खुले; शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्ट संकेत
पुढील बातमी
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची ‘गॅस सिलेंडर’ चिन्हासाठी मागणी

संबंधित बातम्या