उद्योजक सुदेश भोसले यांना मातृशोक

by Team Satara Today | published on : 26 November 2024


सातारा : नागझरी, ता. कोरेगाव येथील उद्योजक, मुंबईतील मराठा मंदिरचे ट्रस्टी, आरोग्य स्पंदन मासिकाचे संपादक सुदेश रा. भोसले यांच्या मातोश्री मालती रामकृष्ण भोसले (वय ९२) यांचे वृध्दापकाळाने सोमवार, दि. 25 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने नागझरीसह कोरेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

थोर समाजसेवक स्व. डी. पी. भोसले यांच्या त्या स्नुषा होत. त्यांच्या पश्चात मुलगा सुदेश, प्रवीण, शिवराज, मुलगी नंदिता आंब्रे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नागझरी येथे काल दि. २५ रोजी नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली तसेच भोसले कुटुंबियांचे सात्वंन केले. नागझरीतील भोसले घराण्याचा सामाजिक सेवेचा वसा जपत त्यांनी मुलांवर चांगले संस्कार करुन उच्चशिक्षित केले. त्यांचा बारावा विधी दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी नागझरी ता. कोरेगाव येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नवीन नियमानुसार केवळ २२ टक्केच महिला या योजनेस पात्र
पुढील बातमी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

संबंधित बातम्या