सातारा : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली शालेय शिक्षण व कीडा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित ५२ वी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात येथीला अनंत इंग्लिश स्कूलमधील इ. ९ वी तील विदयार्थी चि. चव्हाण ऋषिकेश, प्रशांत व ओमकार चव्हाण यांच्या " बहुउद्देशीय सायकल "या उपकरणास राज्यस्तरीय उत्तेजनार्थ कमांक मिळाला. या उपकरणाचा उद्देश स्नायुबलाचा वापर करून बहुउद्ददशीय उपकरण तयार करणे असा आहे तसेच हे उपकरण टाकाऊतून टिकाऊ पद्धतीने केले आहे. यामध्ये ऊर्जा रूपांतरणाचा नियम वापरून टिकाऊ वस्तू वनविण्यात यश मिळविले. "बहुउद्देशीय सायकल " या उपकरणामुळे कपडे स्वच्छ धुणे, कपडे वाळविणे, धान्य चाळणे इ. कार्ये केली जातात. तसेच या उपकरणातून ऊर्जा निर्मिती होऊन अपारंपारिक ऊर्जेचा वापर करता येतो.
तसेच हे उपकरण टाकाऊतून टिकाऊ पद्धतीने केले आहे. वीज लागत नाही. शारीरिक व्यायाम होण्यास मदत होते. वीजेशिवाय पाणी पंप चालू करू शकतो. वीजेचे साठवणूक करता येते. अल्टमेटर द्वारे वीज निर्माण होते.
'चला घेऊया आधुनिकीकरणाचा ध्यास, चला घडवूया भारत आपला खास' असे या वालवैज्ञाानिक राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातून दिसते ऋषिकेश प्रशांत चव्हाण यास विज्ञानशिक्षिका सौ. भाग्यश्री मधुकर फडतरे व प्रयोगशाळा सहाय्यक श्री. शरद कृष्णाजी डांगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनात माध्यमिक गटातील ११० उपकरणांचा समावेश होता. यातील प्रथम ५ कमांकामध्ये उत्तेजनार्थ 'बहुउद्देशीय सायकल' यास कमांक मिळाला. या उपकरणामधून एन. सी. आरटी मधून पुन्हा राष्ट्रीय स्तरावर या उपकरणातून निवड केली जाते.
सातारा एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉ. चेतनाताई माजगावकर, संचालक श्री सुनील झंवर, आजीव शिक्षक मंडळाचे चेअरमन सुहास कुलकर्णी, अजित साळुंखे, मधुकर फडतरे, जितेंद्र देवकर, शालाप्रमुख श्रीमंत गायकवाड, उपशालापमुख सी. ए. एस. शिंदे, पर्यवेक्षक अनिल खटावकर, ए. एम. शेख तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विदयार्थी यांनी अभिनंदन केले.